top of page
SOC SM (5)_edited.png

तुमचा अनबॉक्स

मुलांसाठी

  • अनबॉक्स मुलांसाठी क्रिएटिव्हीटीचा त्यांचा स्वतःचा भावनिक कप्पा आहे

  • अशी जागा जी जीवनात आनंद निर्माण करण्याकरिताच्या संधी मुलांपुढे ठेवते

  • अशी जागा जी मुलांना मुक्तपणे व्यक्त होण्यास मदत करते.

  • अशी जागा जी मुलांना चूक किंवा बरोबर अशा निकषांच्या भयातून मुक्त करते

  • अशी जागा ज्यामुळे मुलांचे चित्त विशाल होत जाते, जिथे एम्पथीला जागा असते. अशी जागा जी मुलांना आनंदी जीवन जगण्यास तयार करते. अनबॉक्समध्ये मुलांसाठी दर आठवड्यात एक याप्रमाणे ४० ऍक्टिव्हिटीज् आहेत, ज्या मुलांना स्वतंत्रपणाने विचार करण्यास प्रोत्साहित करतात.

  • अनबॉक्स मुलांना स्वप्रेरणेतून शिक्षणाचा अनुभव देतो.

पालकांसाठी

  • अनबॉक्स तुम्हाला एक पालक म्हणून काय करायला हवे आणि काय नको हे जाणून घेण्यास सहाय्यक ठरतो.

  • अनबॉक्स तुम्हाला तुमच्या मुलासोबत वात्सल्य, काळजी, सुरक्षितता, सुश्रुषा यापलीकडे जाऊन नाते जोडण्यास मदत करतो.

  • अनबॉक्सने मुलांमधील गुणात्मक विकासाच्या १६ मुलभूत तत्त्वांकडे लक्ष केंद्रित केले आहे.

  • अनबॉक्स तुम्हाला तुमच्या मुलातील मुलभूत आणि सुप्त गुणांचा परिचय करून देतो.

  • कल्पकता, संवेदना, स्वतंत्र विचार, जिज्ञासा, संयम, अभिव्यक्ती, तर्कबुद्धी, एकाग्रता यांना अनबॉक्सच्या ॲक्टिव्हिटीज् च्या माध्यमातून वाव मिळतो आणि हेच गुण तर पुढे जाऊन विद्यार्थ्याला शालेय शिक्षणातील यशाच्या दिशेकडे नेतात.

अनबॉक्स काय आहे?

  • अनबॉक्समध्ये मुलांसाठी दर आठवड्यात एक याप्रमाणे ४० ॲक्टिव्हिटीज् आहेत, ज्या मुलांना स्वतंत्रपणाने विचार करण्यास प्रोत्साहित करतात. अनबॉक्स शिकवण्याकरता नसून शिकण्याकरता आहे.

  • अनबॉक्सनी आवश्यक ती साधनं दिली आहेतच, पण त्यातील कुठल्याही साधनावर अनबॉक्सचा मालकी हक्क नाही. बाजारात सहज विकत मिळतील असेच सारे मटेरियल यात वापरले आहे. त्यामुळे एखादे साधन संपले, तुटले किंवा हरवले तरी थांबायचे कारण नाही. बाजारात जाऊन आणू शकू अशा वस्तूच साधनं म्हणून आम्ही वापरली आहेत.

  • ॲक्टिव्हिटिज् साठीचं साहित्य वापरताना मुलांना सहजता आणि साधेपणा वाटावा म्हणून हे साहित्य हातांनीच बनवलेलं आहे.

  • मुलांनी क्राफ्टमध्ये गुंतू नये म्हणून काही गोष्टी मुद्दाम तयार करूनच दिल्या आहेत. अशा ॲक्टिव्हिटीज् मध्ये हस्तकौशल्यापेक्षा विचारांना अधिक महत्त्व असणार आहे.

  • ॲक्टिव्हिटीज् मधून काही कलाकृती निर्माण होतीलच असे अजिबात नाही. ही मुलांची व्यक्त होण्याची जागा आहे.

 

ॲपमध्ये काय आणि ते कसे वापरावे?

  • ॲप पालक आणि अनबॉक्स यांच्यामधील संवादाचे साधनमात्र आहे.

  • ॲक्टिव्हिटीज् करण्यासाठी असलेला इन्स्ट्रक्शन ऑडिओ हा फक्त मुलांसाठीच आहे. मुलांनी काय करायचे आहे हे त्यात सुचवले आहे. यातून पालकांनी त्यांच्या समजुतीप्रमाणे अर्थ काढून मुलांपर्यंत पोहोचवणे अपेक्षित नाही. मुले आपल्या आकलनानुसार ॲक्टिव्हिटीज् करतील यावर विश्वास असायला हवा.

  • केलेल्या कामात रमण्यासाठी, त्यातून होणाऱ्या स्वयंशिक्षणासाठी, त्याकडे वेगवेगळ्या दृष्टीकोनातून बघून वेगवेगळे परिणाम साधण्यासाठी अनबॉक्सनं दोन ॲक्टिव्हिटीज् च्या मध्ये विशिष्ट कालावधी ठेवलेला आहे. अनबॉक्सने काही विशिष्ट कामांसाठीच तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. जसे, ऑडिओ सूचना मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी, दोन ॲक्टिव्हिटीज् मधला कालावधी पाळला जाण्यासाठी, मुलांचे काम अपलोड करण्यासाठी आणि ॲक्टिव्हिटीज् विषयीचे पॉझिटिव्ह अप्रेझल पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. याव्यतिरिक्त, मुलांची कुठलीही ॲक्टिव्हिटी तंत्रज्ञानावर अवलंबून नाही. ॲप केवळ आणि केवळ पालकांसाठीच आहे.

  • मुलांच्या कामांचे फोटो आणि व्हिडीओज् काढून अपलोड करण्याची सोय ॲपमध्ये आहे. तसेच हे अपलोड केल्यानंतर त्या ॲक्टिव्हिटीचे लर्निंग आऊटकम तुमच्या ॲपवरून ऐकायला आणि वाचायला मिळेल.

१० वर्षात ७० हजार निर्मिती

प्रत्येक मूल कसे शिकते? त्यांची विचार करण्याची दिशा आणि पद्धत कशी असते? हे जाणून
घेत, मुलांचे वेगळेपण टिकवून ठेवण्याकरिता अनबॉक्स गेल्या दहा वर्षांपासून मुलांसोबत
काम करीत आहे.  या प्रवासात मुलांना व्यक्त होण्याची संधी देऊन ७० हजारावर
कलानुभवांची निर्मिती झाली. हाच अनुभव अनबॉक्सच्या माध्यमाने मुलांना मिळतो.

लर्निंग आऊटकमकडे कसे बघावे?

  • ठराविक कृतीतून ठराविक परिणाम साधणे हे प्रशिक्षण. पण शिक्षण म्हणजे मुलांनी केलेल्या छोट्या-मोठ्या कुठल्याही कृतीतून विचार निर्माण करण्याचं काम. अनबॉक्स हे काम करतो. आणि हा विचार पालकांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम म्हणजे लर्निंग आऊटकम

  • लर्निंग आऊटकम हे मुलांच्या कामाचे मूल्यमापन नाही. तर मुलांच्या शिकण्याच्या जागा समजून घेण्याची ही संधी आहे.

  • मुलांच्या कामात मोठ्यांच्या कामाप्रमाणे अचूकता, बारकाई, नेमकेपणा, शिस्त असे काहीही नसणार. लर्निंग आऊटकम ॲक्टिव्हिटीज् च्या परिणांमाविषयी नाहीच, तर मुख्यत: शिकण्याच्या प्रक्रियेबद्दल बोलतो.

  • अनबॉक्सची कुठलीच ॲक्टिव्हिटी ही काय शिकावे यासाठी ठरवून योजलेली नाही. पण ॲक्टिव्हिटी करताना मुले काय शिकतील याची निरीक्षणं इथे मांडलेले आहेत. अर्थातच, परिणामांपेक्षा प्रक्रिया महत्त्वाची!

  • लर्निंग आऊटकमसाठी उपयोगात आणलेला अभ्यास हा वेगवेगळ्या संशोधनांवर आधारित आहे. हे रिसोअर्सेस आणि या साऱ्यांचे संदर्भ अनबॉक्सच्या साईटवर दिले आहेत. वेळोवेळी त्यात भरही टाकली जाते.

  • लर्निंग आऊटकमसोबत जोडलेले व्हिडिओज् हे मुलांच्या ॲक्टिव्हिटीज् चं प्रदर्शन नाही. हे प्रत्येक ॲक्टिव्हिटीज् चं पॉझिटिव्ह अप्रेजल आहे. हे फक्त पालकांसाठी आहे. या माध्यमातून मुलांनी केलेल्या कामावरची सकारात्मक दाद पालकांपर्यंत पोहोचवण्याचे काम अनबॉक्स करतो. यामुळे इतरांशी तुलना करण्याची इथे अपेक्षाच नाही.

  • तसेच तुलनेमुळे येणाऱ्या अहंगंड किंवा न्यूनगंड या भावनांनाही येथे थारा नाही. उलट इतरांसारखेच एक असणे स्वीकारण्याची, नॉर्मलसीचे स्वागत करण्याची क्षमता पालकांमध्ये यावी असा हेतू आहे.

सकारात्मक दाद कशासाठी?

ही फक्त पालकांसाठी आहे. अनबॉक्स मुलांच्या कामाचे मूल्यमापन करीत नाही. मुलांनी केलेल्या कामावरची सकारात्मक दाद तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम मात्र करतो. यामुळे इतरांशी तुलना करण्याची इथे अपेक्षाच नाही. तसेच तुलनेमुळे येणाऱ्या अहंगंड किंवा न्यूनगंड या भावनांनाही येथे थारा नाही. उलट इतरांसारखेच एक असणे स्वीकारण्याची, नॉर्मलसीचे स्वागत करण्याची क्षमता पालकांमध्ये यावी असा हेतू आहे.
अनबॉक्स शिकवण्याचं साधन नाही, शिकण्याचं साधन आहे.

Visit Us to Experience UnBox

SOC_BG_MostProper_Blue.png

A Date with Learning

Call UnBox Buddy- 9823231475

bottom of page